
मध्य रेल्वेने 2025-26 या आर्थिक वर्षात भंगार विक्रीतून 243.06 कोटी रुपयांची कमाई केली. गेल्या महिन्यात कमावलेले 51.86 कोटी रुपयांचे उत्पन्न मागील तीन वर्षांतील ऑक्टोबर महिन्यातील सर्वाधिक उत्पन्न ठरले आहे. ते उत्पन्न गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यातील 28.93 कोटी रुपयांच्या उत्पन्नाच्या तुलनेत 79 टक्क्यांनी अधिक आहे. मध्य रेल्वेचे सर्व 5 विभाग, कार्यशाळा आणि फील्ड युनिट्समधील विविध ठिकाणचे भंगार विकले.




























































