कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने लांबपल्ल्यांच्या गाड्या घटणार

600

मुंबई ते हावडा व्हाया नागपूर जाणारी (ट्रेन क्र.02809/02810)हावडा एक्स्प्रेस आता येत्या 17 जुलैपासून आठवड्यातून एकाच सोडण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे. कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव पाहता पश्चिम बंगालने मुंबईतून येणार्‍या गाड्यांची संख्या कमी करण्यास सांगितल्याने असा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, परप्रांतीयांच्यासाठी उत्तरेतून सोडण्यात येणार्‍या गाड्यांची संख्या वाढविण्याऐवजी आता कमी करण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

लॉकडाऊन शिथील करण्यात आल्यानंतर 12 मे पासून 30 वातानुकूलित गाड्या रेल्वेने सुरू केल्या होत्या. त्यानंतर 1 जून पासून वेळापत्रकावर आधारित 200 लांबलपल्ल्यांच्या ट्रेन सुरू करण्यात आल्या होत्या. परंतू आता या गाड्या देखील कमी करण्याच्या विचारात रेल्वे मंत्रालय असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. त्यातच पश्चिम बंगालच्या विनंतवरून मुंबई, अहमदाबाद, पुणे, नागपूर येथून सुटणारी विमानसेवा बंद करण्याच्या निर्णय झाल्यानंतर आता सीएसएमटीतून दररोज सुटणारी मुंबई ते हावडा एक्सप्रेस (ट्रेन क्र.02809/02810)व्हाया नागपूर ही गाडी आता 17 जुलैपासून आठवड्यातून एकदाच रवाना होणार आहे. ही गाडी दर बुधवारी हावडावरून निघेल आणि दर शुक्रवारी सीएसएमटीतून हावडा रवाना होईल, तिच्या थांब्यात कोणताही बदल करण्यात येणार नसल्याचे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या