वायरमुळे पेंटोग्राफ तुटला; तुकडे उडून दोन महिला जखमी

114

सामना ऑनलाईन,मुंबई

बुधवारी म्हणजेच 17 जुलै रोजी सकाळी विठ्ठलवाडी आणि कल्याण स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मुंबईकडे येणारी लोकल वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती. ओव्हरहेड वायर तुटल्यानंतर पेंटोग्राफही तुटला. पेंटोग्राफ तुटल्यानंतर त्याचे तुकडे लोकलमधून प्रवास करणाऱ्यांच्या अंगावर उडाले.  महिलांसाठी राखीव फर्स्ट क्लासमधून प्रवास करणाऱ्या दोन महिलांच्या डोक्यात हे तुकडे वेगाने आदळल्याने त्या जखमी झाल्या आहेत.

या दुर्घटनेत जखमी झालेल्या दोन महिलांमधील एकीचे नाव हे पायल सभागानी असे आहे. पायल ही फिजिओथेरपिस्ट असून ती मुंबईला निघाली होती. पायलच्या आईने आरोप केला आहे की ती जखमी झाल्यानंतर MRI करणे गरजेचे होते, यासाठी अँम्ब्युलन्सची गरज होती, जी तिथे उपलब्ध नव्हती. आजच्या गोंधळात दुसरी महिला कोण जखमी झाली हे कळू शकलेले नाही.

ओव्हरहेड वायर तुटली, मध्य रेल्वे पुन्हा लटकली

 

आपली प्रतिक्रिया द्या