मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड

ठाणे रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 1, 2, 3,4 आणि 5 पुढील आदेश येईपर्यंत बंद असणार आहे. त्यामुळे कल्याणकडे जाणाऱ्या सर्व लोकल गाड्या मुलुंड स्थानकात थांबवण्यात आल्या आहेत. या बिघाडामुळे काजूंरमार्ग स्थानकापर्यंत गाड्या खोळबंल्याची माहिती मिळत आहे. संध्याकाळची वेळ असल्याने घरी जाण्याच्या घाईत असलेल्या प्रवाशांना यामुळे त्रास सहन कराव लागत आहे. ठाणे स्थानकात बिघाड झाल्याने रेल्वेचा खोळंबा झाल्याचे पाहायला मिळाले.