केंद्र सरकारचा राज्यांना ऍलर्ट, लसीकरणाची तयारी सुरू

देशात कोरोनाच्या लसीकरणाची तयारी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना अॅलर्ट जारी केला आहे. लसीकरणाचा कुठलाही साईड इफेक्ट होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आखा, संबंधित यंत्रणा सर्वतोपरी सज्ज ठेवा, असे निर्देश राज्यांना देण्यात आले आहेत.

राज्य व जिल्हा पातळीवर लवकरच लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या संचालकांना पत्र लिहिले आहे. लसीचा साईड इफेक्ट (दुष्परिणाम) रोखण्यासाठी विशेष खबरदारी बाळगण्यावर भर देण्यात आला आहे. कोरोनाची लस दिल्यानंतर त्याच्या दुष्परिणामाची शक्यता नाकारता येणार नाही. प्राधान्याने आरोग्य सेवक व संबंधितांना लस दिली जाईल. यावेळी कुठलाही दुष्परिणाम दिसला तर तत्काळ त्याची माहिती तज्ञांना दिली पाहिजे, जेणेकरून पुढील धोका टाळला जाईल. याच अनुषंगाने संबंधित यंत्रणा बळकट करा, असे निर्देश राज्यांना दिले आहेत.

केंद्राचे निर्देश काय आहेत?

  • लसीकरणाच्या मोहिमेत राज्यांतील जवळपास 300 मेडिकल का@लेज व इतर रुग्णालयांना सहभागी करून घ्या.
  • लसीचे दुष्परिणाम रोखण्यासाठी राज्यांतील न्यूरोलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट, श्वसन चिकित्सा तज्ञ, प्रसूती व स्त्राr रोगतज्ञ आणि बालरोगतज्ञांनाही सज्ज ठेवा.
आपली प्रतिक्रिया द्या