
मागील पाच वर्षांत देशातील तब्बल 65.7 लाख मुलांनी शिक्षण अर्ध्यावर सोडून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शाळा अर्ध्यावर सोडणाऱया मुलांच्या संख्येच्या बाबतीत भाजपशासित गुजरात पहिल्या, आसाम दुसऱया तर उत्तर प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे.
केंद्रीय मंत्री सावित्री ठाकूर यांनी संसदेत ही माहिती दिली. त्यानुसार शाळा अर्ध्यात सोडणाऱया 65.7 मुलांमध्ये सुमारे 30 लाख मुले किशोरवयीन आहेत. पंतप्रधान मोदींचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये 2025-26 या वर्षात आतापर्यंत 2.4 लाख मुलांनी शाळा सोडली आहे. 2024 या वर्षात हा आकडा 55 हजार होता. त्यात यंदा तब्बल 340 टक्के वाढ झाली आहे. आसाममध्ये दीड लाख, तर यूपीमध्ये जवळपास एक लाख मुलांनी शिक्षणाकडे पाठ फिरवली.


























































