काय सांगता! एक बाटली दारूची किंमत एक कोटी रुपये?

जगात अनेक ठिकाणी दारू शौकिनांसाठी वेगवेगळी दारू उपलब्ध आहे. त्यात महागड्या दारूंचाही समावेश आहे. आपण एखाद्या दारूची किंमत जास्तीत जास्त लाखोंच्या घरात ऐकली आहे. परंत एक बाटली दारूची किंमत तब्बल एक कोटीच्या घरात लागली आहे. ग्राहकाने दारू पिऊनच एवढी महागडी दारू विकत घेतली की काय ?असा प्रश्न काहींना पडला आहे. परंतु हे खरे आहे. एक बाटली व्हिस्कीची किंमत तब्बल एक कोटी रुपये इतकी लागली आहे.

व्हिस्कीच्या बाबतीत जेवढी जुनी दारू असेल तितकी तिची किंमत अधिक असे म्हटले जाते. युरोपमधील जॉर्जिया देशात एका व्हिस्कीच्या बाटलीला 1 लाख 37 हजार डॉलरची बोली लावण्यात आली आहे. हिंदुस्थानी चलनात ही किंमत एक कोटीहून अधिक आहे. ही व्हिस्की दीडशे वर्ष जुने असून 19 व्या शतकात ही व्हिस्की बनवण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार या व्हिस्कीचे नाव ओल्ड इंग्लेड्यु असून 1860 च्या दशकात ही व्हिस्की बाटलीमध्ये बंद करण्यात आली होती. त्याकाळी युरोपचे नावाजलेले उद्योजक जे.पी.मॉर्गन यांच्या मालकीची ही बाटली आहे. या बाटलीवर Bourbon असे लिहिण्यात आले असून ही व्हिस्की 1865 पूर्वी बनवल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

1900 साली मॉर्गन यांनी ही व्हिस्कीची बाटली विकत घेतली होती असे म्हटले जाते. नंतर मॉर्गन यांनी ही बाटली आपल्या मुलाकडे सोपवली होती. सध्या या बाटलीची किंमत 20 ते 40 हजार डॉलरच्या दरम्यान असावी असा अंदाज लावण्यात आला होता. परंतु 30  जून रोजी या व्हिस्कीच्या बाटलीचा लिलाव करण्यात आला होता. तेव्हा एका संग्राहलयाने ही बाटली एक लाख 37 हजार डॉलर्संन विकत घेतली.

ही व्हिस्की 100  वर्षाहून अधिक जुनी आहे. त्यामुळे ही पिण्यायोग्य आहे की नाही याबाबत सांशकता व्यक्त केली जात आहे. कुठलीही व्हिस्की 10 वर्षे खराब होत नाही असे म्हटले जाते. त्यासाठी या व्हिस्कीवर संशोधन सुरू असून ते पिण्यायोग्य आहे की नाही याचा शोध घेतला जात आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या