इराणचा हिंदुस्थानला धक्का; चाबहार प्रकल्पातून हटवल

इराणने चाबहार रेल्वे प्रकल्पातून हिंदुस्थानला हटविले आहे. हिंदुस्थानकडून निधी मिळण्यास विलंब होत असल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे इराणचे म्हणणे आहे. मात्र यामागे चीनची खेळी असून, चाबहारमध्ये आता 400 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक चीन करणार आहे. यामुळे हिंदुस्थानबरोबर अमेरिकेलाही धक्का बसला आहे.

‘द हिंदू’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे. चार वर्षांपूर्वी 2016मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचा दौरा केला होता आणि इराणचे अध्यक्ष रुहाणी यांच्याबरोबर चाबदार रेल्वे प्रकल्पाचा करार केला होता. या करारात अफगाणीस्थानचाही सहभाग हेता.

  • अमेरिका आणि इराणमध्ये संघर्ष आहे. तर चीनचा हिंदुस्थान आणि अमेरिकेबरोबर संघर्ष आहे. त्यामुळेच चीनने इराणच्या चाबहार प्रकल्पात गुंतवणुकीसाठी पाऊल उचलले आहे.
आपली प्रतिक्रिया द्या