
अंधेरीत पवईकडे जाणाऱ्या बसची वाट पाहत असणाऱ्याकडे बसबाबत चौकशी करण्याचा बहाणा करून सोनसाखळी चोरीचा प्रयत्न केला. तेव्हा तक्रारदार याने त्याला विरोध केला. त्या झटापटीत तक्रारदार याच्या गळ्याला दुखापत झाली. तक्रारदार याने पोलीस नियंत्रण कक्षात फोन करून याची माहिती दिली. त्या माहितीनंतर साकीनाका पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी गुन्हा नोंद केला. तपासा दरम्यान पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी अक्षयला ताब्यात घेऊन अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.



























































