राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा :  चंदिगड, साईने जिंकली स्पर्धा

110

सामना ऑनलाईन । कोलकाता

कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस बंदिस्त क्रीडा संकुलात पार पडलेल्या कुमार/कुमारी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील मुलांमध्ये चंदिगड, तर मुलींमध्ये साई यांनी अंतिम विजेतेपद मिळविले. महाराष्ट्राच्या मुलांना तिसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

मुलांच्या अंतिम सामन्यात चंदिगडने उत्तर प्रदेशचे आव्हान 41-32 असे संपवत या गटाचे जेतेपद पटकावले. मुलींच्या गटात अत्यंत चुरशीने खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात साईने हरयाणावर 33-29अशी मात करीत या गटाचे विजेतेपद आपल्याकडे राखले. या अगोदर झालेल्या मुलांच्या उपांत्य सामन्यात चंदिगडने महाराष्ट्राला 48-34 असे, तर उत्तर प्रदेशने तामीळनाडूला 27-19असे पराभूत करीत अंतिम फेरीत धडक दिली होती. मुलींमध्ये साईने उत्तर प्रदेशवर 39-21 असा, तर हरयाणाने छत्तीसगडवर 33-19 असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती.

आपली प्रतिक्रिया द्या