चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीला ब्राह्मण महासंघाचा विरोध

chandrakant patil bjp minister says maharashtra
कोथरुड-चंद्रकांत पाटील

पुण्यातील विधानसभा मतदारसंघामध्ये युती आणि आघाडीसह इतर पक्षांकडून उमेदवारी जाहीर करण्यास सुरुवात होताच काही मतदारसंघांत राजकीय फलकबाजी करण्यात आली. दरम्यान चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीला ब्राह्मण महासंघाने विरोध केला आहे.

विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतसे राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. अनेक इच्छुकांची तिकिटे कापली जाणार असल्याने ते बंड करण्याच्या तयारीत आहेत. त्यातच आता कोथरूड आणि कसबा मतदारसंघांमध्ये विविध ठिकाणी राजकीय आशयाचे फलक लावण्यात आले आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील कोथरूडमधून विधानसभा मतदारसंघांतून निवडणूक लढकणार असल्याची चर्चा आहे, मात्र ब्राह्मण महासंघाने त्यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या