शरद पवार कांगावा करण्यासाठी प्रसिद्ध, चंद्रकांत पाटील यांची टीका

800

ईडीने शरद पवारांना फक्त चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यातून काहीच निष्कर्ष निघाला नाही. पवार कांगावा करण्यासाठी प्रसिद्ध आहेत अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. एका मुलाखातीदरम्यान पाटील यांनी टीका केली आहे.

साप्ताहिक विवेकसाठी मुलाखत देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “ईडीच्या विषयात भाजप सरकारची काहीही भूमिका नाही. याचिकाकर्त्यांनी दहावेळा शरद पवारांचं नाव घेतलं त्यामुळे न्यायालयाने त्या आधारे निर्णय देत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यात शरद पवारांचं नाव आलं तर यात राज्य सरकारचा कुठे संबंध येतो? ईडीनेही त्यांना केवळ चौकशीसाठी बोलावलं होतं, कोणताही निष्कर्ष काढला नव्हता. कांगावा करण्यासाठी शरद पवार प्रसिद्धच आहेत. त्यामुळे यावेळीही त्यांनी सहानुभूती मिळवण्यासाठी प्रयत्न चालवला आहे. परंतु, लोकांमध्ये शरद पवारांची प्रतिमा ही लोकांना फसवणारे, पाठीत खंजीर खुपसणारे, शब्द न पाळणारे अशीच आहे’’. त्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांना सहानुभूती वाटण्याचा प्रश्नच येत नाही. तसाच या सगळ्याचा मतदानावर परिणाम होण्याचाही प्रश्न उद्भवत नाही असेही पाटील यावेळी म्हणाले.

राज्यात महायुतीला २२०-२२१ जागा मिळतील असा अंदाज पाटील यांनी व्यक्त केला. तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला केवळ ४० जागा मिळतील असेही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या