चंद्रकांत पाटील यांना शरद पवारांवर पीएचडी करायचीय

897

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पीएचडी करण्याची इच्छा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

पवार गेली 50 वर्षे राजकारणात आहेत, पण त्यांचा पक्ष 10 पेक्षा जास्त खासदार पाहू शकला नाही. मात्र तरीही पवार हे राजकारणात कायम केंद्रबिंदू असतात ते कसे काय? एकाच वेळी ते उद्धव ठाकरे, राज ठाकरे, सोनिया गांधी यांच्याशी संवाद साधून त्यांना त्यांचे म्हणणे कसे काय पटवून देतात? हे प्रश्न माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. म्हणून मला त्यांच्यावर पीएचडी करायची आहे, असे पाटील म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या