
चंद्रपूर जिल्हात वाघाची दहशत सुरु असताना अस्वल दिसल्याने एकच खळबळ उडाली. मूल शहराला लागून असलेल्या उमा नदीकाठच्या झाडावर अस्वल बसलेलं होते.अस्वलला बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. माहिती मिळताच पोलिस आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी अस्वलला हाकलून लावले. ज्या भागात अस्वल होते त्या भागात जाण्याचे टाळावे असं आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.
































































