चंद्रपूर – शिवसेनेचा स्तुत्य उपक्रम, वही पेन वाटप “एक हात मदतिचा”

शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्य ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कोरोनाच्या महामारी मुळे शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणा पासून वंचित राहावे लागत आहे. ग्रामीण भागात कित्येक विद्यार्थी आर्थिक परिस्थिति मुळे बुक पेन विकत घेऊ शकत नाही. यामुळे गोरगरीब विद्यार्थी शिक्षणापासुन वंचित राहु नये व विद्यार्थ्यांना अभ्यासाची सवय लागावी म्हणून माजी शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार यांच्या नेतृत्वात विध्यार्थ्यांना वही व पेन वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आव्हानाला शिवसेना तालुका मूलचे वतीने एक हात मदतिचा व  शेकडो विद्यार्थ्यांना वही पेन वाटप करुन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दुगनित करण्यात विद्यार्थ्यांना काही समस्या असतील तर ते त्वरित दूर करणार, असा संकल्प या वेळी शिवसेना माजी तालुका प्रमुख तथा सदस्य ग्राम पंचायत प्रशांत गट्टूवार यानी केला. यावेळी प्रेमदास निकेसर, गुणेश लेनगुरे, संतोष इटकलवार, शुभम बलगेलवार, बलवंत चलाख, विनोद चिचघरे, रोशन वाढ़ई, योगेश लेनगुरे सह शिवसैनिक उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या