चंद्रपूर जिल्हयातील बाधितांची संख्या 204; बरे झालेल्या बाधिताची संख्या 104

375

चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधिताची संख्या 204 झाली आहे. 100 बाधित सध्या जिल्ह्यात उपचार घेत आहेत. तर 104 बाधित सध्या कोरोना संक्रमणातून मुक्त झाले आहेत. त्यापैकी 15 जण हे जिल्ह्याबाहेरील बाधित असून राज्य राखीव पोलीस दलाचे 10 जवान व 5 जण अन्य राज्याचे रहिवाशी आहेत.

आज पुढे आलेल्या बाधितामध्ये चंद्रपूर जिल्हयातील सिंदेवाही तालुक्यातील मोहाडी येथील 23 वर्षीय नागरिक पॉझिटिव्ह आला आहे. हैद्राबाद येथून 9 जुलैला आलेला हा युवक संस्थात्मक अलगीकरणात होता. काल त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. भद्रावती येथील बंगळूरू शहरातून 10 जुलैला परत आलेल्या 22 वर्षाच्या पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 11 जुलैला स्वॅब घेण्यात आला होता.

चंद्रपूर अंचलेश्वर गेट जवळील केरळ राज्यातून परत आलेला 28 वर्षीय युवक पॉझिटिव्ह ठरला आहे. 9 जुलैला आलेला हा युवक संस्थात्मक अलगीकरणात होता. 12 जुलैला त्यांचा स्वॅब घेण्यात आला. आज पॉझिटिव्ह अहवाल आला. या शिवाय पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कातून बाधित झालेले 3 जण पुढे आले आहेत. यामध्ये सिव्हिल लाइन चंद्रपूर येथील एका कारखान्यात काम करणाऱ्या यापूर्वी पॉझिटिव्ह ठरलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेली 47 वर्षीय पत्नी, 18 व 10 वर्षीय दोन मुले यांचा सहभाग आहे. या सर्वांचा स्वॅब 12 जुलैला घेण्यात आला होता.

आपली प्रतिक्रिया द्या