चंद्रपूर- संचारबंदी लागू असूनही नागरिक रस्त्यावर, पोलिसांनी परत पाठवलं

5280

राज्यात संचारबंदी लागू झाल्यानंतर सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील करण्यात आल्या. चंद्रपूरच्या सीमाही सील करून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. माल वाहतूक आणि गरजू लोकांची ओळख पटवून त्यांना आंतरजिल्हा प्रवेश दिला जात आहे. मात्र अनावश्यक फिरणारे हौसेही मोठ्या प्रमाणात बाहेर पडलेले दिसून आले. अशा लोकांना परत पाठवलं जात आहे.

चंद्रपुरातून यवतमाळ जिल्ह्यात जाणाऱ्या लोकांची संख्या मोठी असल्याचं दिसून येत आहे. यवतमाळ जिल्ह्यात दारुबंदी नसल्याने त्याचा छुपा लाभ घेण्यासाठी अनेक लोक दुचाकी घेऊन निघाले. मात्र पोलिसांनी त्यांना हाकलून लावलं. पोलिसांनी अजूनपर्यंत आपला हिसका न दाखवल्यानं नागरिकांना संचारबंदीचं गंभीर्य आलेलं नाही. पण गरज पडल्यास त्याचाही वापर केला जाईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

पाहा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या