चंद्रपूरचे नवे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी स्वीकारला पदभार

2087

सोमवारी बदलीचे आदेश जारी झाल्यानंतर आज लगेच चंद्रपूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून अजय गुल्हाने यांनी पदभार स्वीकारला. निवर्तमान जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी त्यांना पदभार सोपवला. विशेष म्हणजे कुणाल खेमणार यांची झालेली बदली ही अन्याय करणारी असल्याचा आरोप करून चंद्रपूरकरांनी सकाळीच आंदोलन केलं होतं. खेमणार यांनी कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी केली होती. ते स्वतः एमबीबीएस डॉक्टर असल्यानं त्याचा पूर्ण अनुभव त्यांनी इथं पणाला लावला. कोरोनावर नियंत्रण आणि मृत्युदर कमी ठेवण्यात त्यांचं नियोजन प्रभावी ठरलं होतं. सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होणारा अधिकारी म्हणून ते लोकप्रिय झाले होते. त्यामुळं त्यांच्या बदलीला विरोध झाला. त्यांच्या पुनर्स्थापनेसाठी राजकीय हालचाली पण झाल्या. मात्र, अपेक्षेपेक्षा आधीच येऊन गुल्हाने येऊन पदभार घेतला. त्यामुळं प्रशासकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान नव्या जिल्हाधिकाऱ्यांनी ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंट या त्रिसूत्रीवर काम करणार असल्याचं स्पष्ट केलं.

आपली प्रतिक्रिया द्या