कृषी प्रदर्शन बघण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू

30

अभिषेक भटपल्लीवार । चंद्रपूर

चंद्रपूर शहरात सुरू असलेले कृषी प्रदर्शन बघण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. विजेंद्र मेश्राम (48) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील सावरगाव येथील ते रहिवासी होते.

दुपारचे जेवण घेतल्यानंतर या शेतकऱ्याला भोवळ आली आणि ते कोसळले. त्यांना लगेच जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला. आज सकाळी  सावरगाव या गावातून नऊ शेतकरी प्रदर्शन बघण्यासाठी चंद्रपूरला आले होते. कृषी विभागाने त्यासाठी वाहन पाठवलं होतं. मात्र इथं आल्यावर विजेंद्र यांचा मृत्यू झाला. या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून, घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱयांनी रुग्णालयाकडे धाव घेतली.

आपली प्रतिक्रिया द्या