चंद्रपूरात कारवा गावालगत नवीन जंगल सफारी सुरू

चंद्रपुर वनवृत्तातील मध्य चांदा वनविभाग अंतर्गत वनपरिक्षेत्र बल्लारशाह, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे माध्यमातुन संपूर्ण आदिवासी वस्ती असलेल्या ‘कारवा’ गावालगत ग्रामीण भागातील नागरिकांच्या सक्रिय लोकसहभागातून प्रादेशिक जंगलात पहिल्या पर्यटन सफारीचा प्रारंभ झाला. देशातील हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग आहे.

वन-वन्यजिव व्यवस्थापन करणे, मानव व वन्यजिव यांच्यात सहजिवन प्रस्तापित होऊन व वनाचे शाश्वत जतन करुन लोकांचे वनावरील अवलंबात्व कमी करुन वनाचे माध्यमातुन ग्रामीणांना रोजगार उपलब्ध करण्याचा यामागचा हेतू आहे. कारवा’ येथे बैलगाड़ी रस्ते व कूप रस्ते यांचा वापर करुन 30 कि. मी. चे पर्यटनासाठी कच्चे रस्ते उपलब्ध आहे.

या क्षेत्रात वाघ, बिबट, रानगवे, अस्वल, रानमांजर, हरीन, चितळ, सांबर, नियगाय, चौसिंगा, सायाळ, रानकुत्रे, मुंगूस, मसण्याउड, सायाळ, रानडुक्कर, रानगवे, हे प्राणी व विविध प्रकारची झाडे, 200 प्रकारचे पक्षी व विविधरंगी फुल पाखरे यांचा समावेश आहे. असे निसर्गदर्शन पर्यटकांसाठी वनाविषयी व वन्यजिव विषयी प्रेम निर्माण करण्यास तसेच वनाचे लोकसहभागातुन व्यवस्थापन करणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे.

सुरुवातीला प्रायोगीक तत्वावर खाजगी वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच भविष्यात नोंदणीकृत वाहन यांना प्रवेश देण्यात येईल. सफारीचे प्रवेश शुल्क 500 रुपये आणि गाईड शुल्क 350 रुपये असणार आहे. प्रति दिन सकाळी 6:00 ते 10:00 वाजता, 4 वाहन आणि दुपारी 14:00 ते 16:00 वाजता, 4 वाहन यांना प्रवेश देण्यात येणार आहे. स्थानिक गाईड यांना प्रशिक्षण देण्याचे कार्यवाही सुरु आहे. भविष्यात सदर पर्यटन ऑनलाईन बुकींगसाठी Www.mytadoba.org या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. ताडोबाप्रमाणे या जंगलव्याप्त भागात स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या