चालत्या दुचाकीवर वीज पडून पती-पत्नीचा जागीच मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यात शुक्रवारी चालत्या दुचाकीवर वीज पडून पती-पत्नीचा जागीच मृत्यू झालाय. ब्रम्हपुरी शहराजवळील प्रभुकृपा राईस मिलजवळची ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पारडगाव येथील पिन्टु राऊत (30) व त्यांची पत्नी गुंजन राऊत (27) शुक्रवारी ब्रह्मपुरी शहरात काही कामानिमित्त आले होते व आपले काम आटपून गावाकडे परत जात होते. मात्र विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत असताना प्रभुकृपा राईस मिलजवळ त्यांच्या दुचाकीवर वीज पडली आणि हे दोघेही पती-पत्नी जागीच ठार झाले. शुक्रवारी दिवसभर चंद्रपुरात  विजांचा प्रचंड कडकडाट होता. त्यादरम्यान ही वीज कोसळली. मृतक राऊत दाम्पत्याला 8 महिन्यांची मुलगी असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या