चंद्रपूरमध्ये पाच दिवसाच्या लॉकडाऊननंतर भाजी मार्केटमध्ये नागरिकांची तोबा गर्दी

756

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली, तरी लोकं नियम धाब्यावर बसवून बिनधास्त वागत असल्याचं दिसून आलं. बाजार समितीत हा गंभीर प्रकार आज दिसला. जिल्ह्यात 17 जुलैपासून 26 जुलैपर्यंत लॉकडाऊन घोषित आहे. पाच दिवसांचा पहिला टप्पा काल संपला. या पाच दिवसात औषध दुकानं वगळता सर्व प्रतिष्ठाने बंद होती. भाजीपाला विक्रीलाही बंदी होती. आज यात शिथिलता मिळताच किरकोळ विक्रेते, ठोक व्यापारी आणि लोकांची तोबा गर्दी बाजार समितीत उसळली. गेले पाच दिवस भाजीविना राहणाऱ्या लोकांचा बांध फुटल्याचं चित्र इथं होतं. सोशल डिस्टन्स, मास्कचा अभाव यावेळी दिसून आला.

आपली प्रतिक्रिया द्या