
खंडीत झालेला विद्युत पुरवठा सूरळीत करण्यासाठी विद्युत खांबावर चढलेल्या तरूणाचा विद्युत धक्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यात घडली. रोषण पुंडलीक पाथोडे असे मृतकाचे नाव आहे. जवळपास अर्धा तास पुंडलीकचा देह खांबावरच लटकलेल्या स्थितीत होता.
नागभिड तालुक्यातील बोथली येथील तरूण पुंडलीक पाथोडे हा विजेसबंधीत कामे करायचा. आज (शुक्रवार) चिखलपरसोडी येथे एका घरातील खंडीत झालेला विद्यूत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी पुंडलीक गेला होता. मुख्य विद्यूत लाईनचा पुरवठा खंडित न करता तो खांबावर चढला.
दरम्यान, जिवंत विद्युत तारेच स्पर्श झाल्याने त्याला जोरदार धक्का बसला. यात त्याचा दुदैवी मृत्यू झाला. त्याचा मृतदेह लोंबकळलेल्या स्थितीत खांबावरच लटकत होता.
दुर्दैवी घटनची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि महावितर, पोलिसांना माहिती दिली. अखेर विद्यूत पुरवठा खंडीत करून तरुणाचा मृतदेह खाली काढण्यात आला. त्यानंतर उपचारासाठी पुंडलीकला नागभिड ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र वैद्यकीय आधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.



























































