
चंद्रपुरात भाजपमध्ये ज्या उमेदवारावरून सकाळपासून वाद सुरू आहे, तो शमण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. वीस गुन्हे दाखल असलेले उमेदवार अजय सरकार यांचे तिकीट अखेर कापण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या अजय सरकार यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्यावर तेवढेच गंभीर आरोप केले.
आमदार जोरगेवार यांनीच अजय सरकार यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध केला होता आणि शेवटी त्यांची तिकीट कापण्यात यशस्वी झाले. या घटनाक्रमानंतर अजय सरकार आता आक्रमक झाले असून, त्यांनी जोरगेवार यांच्यावर थेट हल्ला चढवला. मला क्रिमिनल संबोधण्याआधी तुम्ही दहा वर्षांपूर्वी फार्म हाऊसवर कसे पकडले गेले आणि पन्नास लाख रुपये देऊन कसे सुटले, हे मला माहिती आहे, असा गौप्यस्फोट सरकार यांनी केला. तुमचा मुलगा ड्रग्स प्रकरणात सापडल्यावर दहा लाख देऊन त्याला कसे सोडवले, तुमचा मुलगा रात्रीच्या वेळी कोणत्या मुलींना घेऊन जातो, हे सर्व मला माहित आहे. शिवाय माझ्यावर वीस गुन्हे असल्याचे जोरगेवार म्हणाले, पण ते चुकीचे बोलले. माझ्यावर 33 गुन्हे दाखल असून, ते राजकीय स्वरूपाचे आहेत. त्यांची सेवा करीत होतो, तेव्हा गुन्हेगार नव्हतो. आता तिकीट द्यायची वेळ आली, तर गुन्हेगार झालो काय, असा संतप्त सवालही सरकार यांनी केला.





























































