ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गडचिरोली पोलीस सज्ज, पोलिसांच्या मदतीला 2 हेलिकॉप्टर

helicopter

नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल जिल्ह्यात कोणतीही निवडणूक असो, पोलीस प्रशासनापुढे मोठे आव्हान असते. निवडणूक निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलिस विभागाची मोठी भूमिका असते. गडचिरोली जिल्ह्यातील एकूण 361 ग्रामपंचायतीत निवडणूका होत आहेत. जिल्ह्यात दोन टप्प्यात मतदान होत असून, 15 जानेवारी आणि 20 जानेवारी अशा दोन टप्प्यात मतदान पार पडणार आहे.

पहिल्या टप्प्यात उत्तर गडचिरोलीतील गडचिरोली, कोरची, आरमोरी, कुरखेडा, देसाईगंज, धानोरा या 6 तालुक्यातील 198 ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी 13 ग्रामपंचायतीत बिनविरोध निवड झाली आहे. तर प्रत्यक्ष 170 ग्रामपंचायतीत मतदान होत आहे.

एकही अर्ज सादर न केलेल्या ग्रामपंचायतीत धानोरा तालुक्यातील 2 ग्रामपंचायती आहेत. मतदानासाठी मतदान पथकांना नेण्यासाठी पोलिसांच्या मदतीला दोन हेलिकॉप्टर मिळाले असून, त्या माध्यमातून ही पथके मतदान केंद्राच्या बेस कॅम्पपर्यंत पोहचवण्यात येत आहेत.

पहिल्या टप्प्यातील तालुके – गडचिरोली, कोरची, आरमोरी, कुरखेडा, देसाईगंज, धानोरा

दुसऱ्या टप्यातील तालुके- अहेरी, एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, मूलचेरा

आपली प्रतिक्रिया द्या