वीज केंद्रातील चिमणीवर चढले प्रकल्पग्रस्त

989

चंद्रपूर येथील वीज केंद्रासाठी जमीन देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यास कमालीचा विलंब होत असल्यानं आज आठ प्रकल्पग्रस्त वीज केंद्रातील चिमणीवर चढून आंदोलन करीत आहेत. वीज केंद्रातील नऊ क्रमांकाच्या संचाच्या चिमणीवर हे आंदोलक चढले असून यात पाच पुरुष व तीन महिलांचा समावेश असल्याचं सांगण्यात येतं.

वीज केंद्रासाठी परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या. मोबदल्यात एक स्थायी नोकरी देण्याचा करार वीज कंपनीने केला होता. मात्र अनेक वर्षे उलटूनही नोकऱ्या देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळं प्रकल्पग्रस्तांनी आज ही विरुगिरी केली. हा संपूर्ण परिसर सीआयएसएफच्या संरक्षणात आहे. तरीही हे आंदोलक चिमणीवर चढल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. सध्या घटनास्थळी सर्व वरिष्ठ अधिकारी पोचले असून, आंदोलकांना खाली उतरण्याचं आवाहन करीत आहेत. मात्र आंदोलक नियुक्तीपत्र देण्याची मागणी करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या