चंद्रपुरात भीषण अपघात; 6 जण ठार

2010

जिल्ह्यातील मूल तालुक्यातील केसलाघाट येथे झालेल्या भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर सातजण गंभीर जखमी आहे. अपघातातील जखमींना मूल येथील उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. प्राथमिक माहितीनुसार भरधाव स्कॉर्पिओ गाडीने मार्गावर बंद असलेल्या ट्रकला मागून धडक दिली. या अपघातातील मृतक गोंदिया येथे देवदर्शनाला गेले होते, अशी माहिती आहे. हे सर्व लोक चंद्रपुरातील रहिवाशी आहे. गोंदिया येथे देवदर्शनाहून येताना हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी रवाना झाले असून जखमींना मूल येथील उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. अपघात इतका गंभीर होता की जवळपास अर्धी स्कार्पिओ गाडी ट्रकच्या मागील बाजूमध्ये घुसली आहे.

मृतकांमध्ये संभाजी भोयर, कुसुम भोयर, जियान भोयर (दीड वर्ष), दत्तू झोडे, मीनाक्षी झोडे, शशिकला वांढरे, तर जखमींची नावं जितेंद्र पटपल्लीवार, मनीषा भोयर, अंकिता पेटकुले, क्रिश पाटील, सोमी पाटील , शीला पाटील, रेखा खटिकर आहे, पोलिस घटनेचा तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या