
भरधाव वेगात असलेल्या शिवशाही बस मधून अचानक धूर निघायला लागल्याने प्रवासी घाबरले. परंतु वाहनचालकाच्या समय सुचकतेने बसला सुरक्षित रस्त्याच्या कडेला उभं करत प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं.
बल्लारपूर अहेरी मार्गावरील आमडी गावाजवळ ही घटना घडली. शिवशाही बस चंद्रपूरवरून अहेरीला जात होती. अचानक शॉट सर्किट झाल्याने भरधाव वेगात असलेल्या बसमधून धूर निघाला. घटनेची माहिती मिळताच कोठारी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तुषार चव्हाण घटनास्थळी दाखल झाले.




























































