चंद्रपुरात रेशीम पर्यटन विकास केंद्र, विजय वडेट्टीवर यांच्या हस्ते भूमीपूजन

चंद्रपूर जिल्ह्यात रेशीम संचालनालयामार्फत आयोजित टसर रेशीम पर्यटन विकास केंद्राचे भूमिपूजन ताडोबाच्या बफर झोनमध्ये असलेल्या आगरझरी येथे करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात आले.

रोजगार निर्मितीसाठी या प्रकल्पाची उभारणी होणार आहे. तसेच येथे येणार्‍या देश-विदेशातील पर्यटकाला वन पर्यटनासोबतच रेशीम पर्यटनाचासुद्धा आनंद यानिमित्ताने घेता येणार आहे. जिल्ह्यात नव्याने उभा राहत असलेल्या रेशीम प्रकल्पाच्या व्हीजनला व कार्याला कोठेही अडथळा येणार नाही, असे पालकमंत्री वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. टसर रेशीम प्रकल्पाच्या माध्यमातून या परिसरातील स्थानिक नागरिकांना मोठा रोजगार प्राप्त होणार आहे.

आरमोरी आणि पाथरी या ठिकाणी रेशीमचे उत्पादन होत असून तिथे विक्री केंद्रे सुद्धा आहेत. त्याच धर्तीवर हे केंद्र असणार आहे. या केंद्रासाठी वनविभागाने एक एकर जमीन या प्रकल्पास उपलब्ध करून दिली आहे. हा प्रकल्प म्हणजे पर्यटन आणि रेशीम यांच्या समन्वयातून निर्माण होणारा प्रकल्प आहे. उत्पादकांना छोटे स्टॉल याठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहेत व त्या ठिकाणी सदर उत्पादने विक्रीला असतील. गावातील स्थानिक नागरिकांना व बचतगटांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या