
शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला चंद्रपुरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सकाळी 10 वाजता उघडणारी बाजारपेठ आज पूर्णपणे बंद आहे. गजबजलेला आणि मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी चौकातही शुकशुकाट दिसून आला.
या बंदला राज्यातील सत्ताधारी पक्षांचा पाठिंबा असल्यानं बंद प्रभावी दिसत आहे. सराफा, किराणा, कापड, खासगी बस वाहतूक हे सारं ठप्प आहे. चंद्रपुरातील बाजार समितीतही शुकशुकाट असून, फळ आणि भाजी बाजार पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. इथे फळ आणि भाजी विक्रेत्यांनी निदर्शने करीत जोरदार घोषणाबाजी केली.
केंद्र सरकारविरोधात नारेबाजी करण्यात आली. अजूनपर्यंत राजकीय पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले नाहीत. बंद पूर्णपणे शांततेत सुरू आहे. जिल्ह्यात कुठेही अप्रिय घटनेची माहिती नाही.



























































