
चंद्रपूर जिल्ह्यात वाघासाठी महामार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली. ही घटना नागभीड-ब्रम्हपुरी महामार्गावरील सायगाटा येथे घडली.
दोन दिवसांपूर्वी दुपारी एक वाघ रस्त्याच्या शेजारी बसला होता. मात्र रस्त्यावरील भरधाव आणि अवजड वाहतुकीमुळे वाघाला रस्ता ओलांडताना अडचणी होत्या. याची माहिती कुणीतरी वनपथकाला दिली. पथकाने महामार्गावर धाव घेतली. वनविभागाने वाहतूक थांबवून वाघोबाला जाण्यासाठी रस्ता मोकळा करून दिला. दोन्ही बाजूची वाहतूक थांबवून वाघोबाला जाण्यासाठी पुरेसा वेळ दिला. ही कृती लक्षात येताच वाघाने रुबाबात महामार्ग ओलांडला आणि वाहतूक सुरळीत झाली.




























































