Video – चंद्रपूर वीज केंद्रातील नाल्यात दोन वाघांचे दर्शन झाल्याने खळबळ

चंद्रपूर येथील वीज केंद्रातील नाल्यात दोन वाघाचे दर्शन झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. वीज केंद्राच्या हिराई विश्रामगृहालगत असलेला हा नाला असून, गर्द वनराईने नटलेला आहे. याच वनराईत ही जोडी वास्तव्यास आहे.

ताडोबाच्या बफर झोनमधून प्रवास करीत या जोडीने इथे आश्रय घेतला आहे. वनविभागाच्या माहितीनुसार, वाघांची ही जोडी गेल्या अनेक दिवसांपासून इथे आहे. त्यावर विभागाची नजर आहे.

वास्तव्यासाठी योग्य ठिकाणी सापडल्याने त्यांनी इथे बस्तान मांडले. एका म्हशीची शिकार करून त्यावर ताव मारतानाचे दृश्य कॅमेराबद्ध झाले असून, ते व्हायरल होत आहेत.

मोकाट जनावरे, लपण्यासाठी घनदाट वनराई आणि मुबलक पाणी, यामुळे वाघ इथे सुरक्षित वास्तव्य करीत आहेत. मात्र, या मार्गावरून जाणारे कर्मचारी आणि इतर नागरिकांना भीती निर्माण झाली आहे.

पाहा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या