चंद्रपूर – हिंदुस्थानी सैन्यात निवड झाल्याबद्दल गावकऱ्यांनी केला तरुणाचा अनोखा सन्मान

गावातील पोरगा सैनिक झाला म्ह्णून गावकऱ्यांनी त्या तरुणाची उत्साहात मिरवणूक काढल्याचं सुखद चित्र चंद्रपूर जिल्ह्यात पाहायला मिळालंय. भंगाराम-तळोधी येथे राहणारा महेंद्र राऊतवार याची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची आहे. मात्र, असं असतानादेखील त्याने अतिशय जिद्दीने सैनिक भरतीसाठी प्रयत्न केले आणि सैन्यात त्याची निवड झाली.

आपल्या गावचा, आपल्या गल्लीत आपल्यासोबत खेळणारा मित्र सैनिक होतोय या भावनेन अतिआनंदी झालेल्या गावातील तरूणांनी वाजतगाजत, फटाके फोडून, ढोलताशाच्या गजरात आपल्या सूपुत्राला निरोप दिला. हा प्रसंग बघतांना उपस्थितांचे डोळे आपसूचक पाणावले.

महेंद्र हा चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालय येथे बीए प्रथम वर्षाला शिक्षण घेतो आणि जिद्द ,चिकाटी आणि मेहनत या तीनही गोष्टीची साद घालत महेंद्रने केलेली मेहनत आज फळाला आली.

महेंद्र एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा देशसेवेसाठी तयार होतो आहे ही निश्चितच गावकऱ्यांसाठी आनंदाची बाब होती. त्यामुळेच महेंद्र बंगळुरू येथे होणाऱ्या ट्रेनिंगसाठी निघाला त्यावेळेस गावकऱ्यांनी जल्लोष करत महेंद्रचा सन्मान केला आणि गहिवरल्या मनाने त्याला निरोप दिला.

पाहा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या