
पुणे महापालिकेच्या निवडणूक प्रशासनाचा अभुतपुर्व गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. उमेदवारी अर्ज भरणे, छाननी आणि माघारीची प्रक्रिया पूर्ण होऊनही निवडणूक विभागाकडून अद्ययावत आणि अधिकृत माहिती जाहीर केली जात नसल्याने निवडणुक विभागावर दबावाची चर्चा सुरू झाली आहे. निवडणुक विभागातील अधिकारी एकमेकांकडे बोट करत असून नवडणुक प्रमुख असलेले महापालिका आयुक्त नवल किशोर राम या सर्व प्रकाराकडे कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मतदारांसह राजकीय पक्षांसह उमेदवारांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे.
महापालिकेची निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असतानाच निवडणुक विभागाचा भोंगळ कारभार सुरू झाला आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर २४ तास उलटूनही अचूक व अंतिम याद्या निवडणुक विभागाने जाहीर केल्या नाहीत. आता चिन्ह वाटप झाले तरीदेखील अंतिम याद्या जाहीर केल्या जात नाहीत. महापालिकेच्या महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरही आवश्यक माहिती वेळेवर उपलब्ध करून दिली जात नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विशेष म्हणजे, हीच माहिती निवडणूक विभागाकडून स्पष्ट मिळायला हवी असताना प्रशासनाने अक्षरशः हात वर केले असल्याचे चित्र आहे. काही अधिकार्यांकडे विचारणा केल्यास तेही परस्परविरोधी माहिती देत असल्याने निवडणूक अधिकारीच गोंधळात असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांचे अंतिम नियोजन केले असताना प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अनेक उमेदवारांना प्रचाराची दिशा ठरवण्यात अडथळे येत आहेत. उमेदवारांनाही नेमके कोण कुणाच्या विरोधात उभे आहेत, याची खात्री मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. एकीकडे पारदर्शक निवडणूक प्रक्रियाचे ढोल वाजवले जात असताना दुसरीकडे प्राथमिक माहितीही वेळेवर न देण्याची प्रशासनाची भूमिका संशयास्पद ठरत आहे. लोकशाहीच्या उत्सवातच जर असा गोंधळ असेल, तर निवडणूक प्रक्रियेवर विश्वास कसा ठेवायचा? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
मतदारांमध्येही गोंधळ
आत्तापर्यंतच्या उमेदवारी अर्ज भरणे, छाननी आणि माघारीची प्रक्रियांमध्ये कोणतीच माहिती वेळेवर आणि पुर्णपणे जाहीर न केल्याने कोण कोणा विरूध्द कोण कोणत्या पक्षातून हे समोर येत नाही. त्यामुळे मतदारांमध्येही संभ्रम असून प्रचाराला उमेदवार आल्यानंतर उमेदवारांची माहिती मिळत आहे.
म्हणतात बाबरकांडे माहिती विचारा
पालिकेची निवडणूक कंडक्ट करण्याची जबाबदारी असणारे पालिकेचे निवडणूक कार्यालयाचे उपायुक्त प्रसाद काटकर यांना विचारले असता त्यांनी माहिती व जनसंपर्क आणि सोशल मिडियाचे प्रमुख असलेले तुषार बाबर यांच्याकडून माहिती घ्यावी असे सांगितले. यावर बाबार यांना संपर्क साधला असता बाबार म्हणाले निवडणूक निर्णय अधिकार्यांकडून माहिती येत नसल्याने वेळेत माहिती देता येत नाही. त्यांच्याकडून माहिती आल्यावर तत्काळ माहिती दिली जाईल.
अनेक निवडणुक निर्णय अधिकारी सुस्त
पंधरा क्षेत्रिय कायालायसाठी नेमणूक केलेले निवडणुक अधिकार्यांपैकी अनेक निवडणुक निर्णय अधिकारी सुस्त असल्याचे समोर आले आहे. काही अधिकारी फोन बंद करून बसतात.
































































