अहमद पटेलांच्या सभेत मुस्लिमांचा गोंधळ, स्टेजवर चढण्यास केला विरोध

सामना ऑनलाईन । वडगाव

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या प्रचारसभेत मुस्लीम नागरिकांनी गोंधळ घातल्याचे समोर आले आहे. मुस्लिमांसाठी तुम्ही काय केले ते सांगा नंतर प्रचार करा, असा दमच मुस्लिमांनी पटेल यांना भरला. त्यामुळे काही वेळ सभास्थळी तणावाचे वातावरण होते.

अहमद पटेल हे गुजरातमधील पाटण मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार जगदीश ठाकोर यांच्या प्रचारासाठी आले होते. त्यावेळी मुस्लीम समुदायाच्या लोकांनी त्यांना स्टेजवर चढण्याआधी घेरले व राज्यसभेवर इतकी वर्ष आहात मग मुस्लिमांचा काय विकास केला असा सवाल त्यांनी केला. तसेच तुम्ही आमचा विकास केला नाही मग आम्ही तुम्हाला मच का द्यायचे, असे देखील विचारले. त्यांच्या या प्रश्नांनी अहमद पटेल काही वेळ बिथरले मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुस्लिमांना बाजूला करून पटेल यांना स्टेजवर चढू दिले.