गॅस सिलेंडरची चोरी करणाऱ्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 गॅस सिलिंडरची चोरी प्रकरणी एकाला चारकोप पोलिसांनी अटक केली. मनोज सुरेंद्र शर्मा असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून पोलसांनी 12 सिलिंडर जप्त केले आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळे नागरिकांना गॅस सिलिंडर मिळताना अडचणी येत असून सिलिंडरसाठी नागरिकांच्या प्रचंड रागा लागत आहेत. असे चित्र सध्या मुंबईत आहे. तक्रारदार याने गेल्या महिन्यात चारकोप पोलीस ठाण्यात धाव घेतली. पार्क केलेल्या टेम्पोतून 27 गॅस सिलिंडर चोरी झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली. चारकोप पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. वरिष्ठ निरीक्षक विनायक चव्हाण यांच्या पथकातील अधिकाऱ्याने तपास सुरू केला. पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. एका फुटेजमध्ये पोलिसांना टेम्पोचा नंबर दिसला. त्यावरून तपासाची चव्रे फिरली. पोलिसांनी नालासोपारा येथून मनोजला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी एक टेम्पो आणि 12 गॅस सिलिंडर जप्त केले.