संभाजीनगर-जालना जिल्ह्यांच्या सीमेवर चेकपोस्ट; तपासणीनंतरच जिल्ह्यात प्रवेश

सरकारने ब्रेक द- चेन अंतर्गत बजावलेल्या आदेशानुसार जालना-संभाजीनगर जिल्ह्याची सीमा जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील वरुडी येथे चेक पोस्ट बनवून बंद करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा व इ-पास असल्याशिवाय कोणालाही प्रवेश देण्यात येत नसल्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवार यांनी सांगितले.

जालना जिल्ह्याची सीमा असलेल्या सर्व ठिकाणी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांच्या आदेशाने चेक पोस्ट सुरू करण्यात आल्या असून त्यानुसारच जालना-संभाजीनगर जिल्ह्याची सीमा असलेले वरुडी येथे बदनापूर पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी सीमा बंद करत वाहन तपासणी सूरु केली. या ठिकाणी चार पोलीस कर्मचारी 23 एप्रिलपासून चेक पोस्टवर तैनात करण्यात आले असून जालना जिल्हा हद्दीत इ- पास असेल तर किंवा अत्यावश्यक सेवा असेल तरच प्रवेश दिला जात आहे. अन्यथा इतर वाहनांना जिल्ह्यात प्रवेश बंद करण्यात आला आहे.

जालना – संभाजीनगर जिल्ह्याची हद्द बदनापूर तालुक्यातील वरुडी येथे असल्याने व शासनाने कोरोना रोगाचा प्रदुभाव रोखण्यासाठी जिल्हा बंदी व इतर महत्वाचे निर्णय घेतल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांनी शासनाच्या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याची सूचना संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. बदनापूर पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवार यांनी तातडीने आदेशाचे पालन करीत वरुडी येथे चेक पोस्ट सुरू केले असून जालना जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. इ पास असेल तरच प्रवेश दिला जात आहे. ई पास नसेल तर त्या वाहनांना प्रवेश नाकारला जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या