रोज पिझ्झा खाऊनही त्याने घटवले 36 किलो! कसे ते वाचा…

833

शीर्षक वाचून गोंधळला असाल ना? कसं शक्य आहे.. पिझ्झा खाण्याचा आणि वजन घटण्याचा कसा काय संबंध… छे.. असं होऊच शकत नाही.. असे विचार तुमच्या मनात नक्की आले असतील. पण, एका माणसाने ही अशक्य वाटणारी घटना शक्य करून दाखवली आहे.

त्याचं झालंय असं की, न्यूयॉर्क शहरातल्या एका व्यक्तिने पिझ्झा खाऊन चक्क 36 किलो वजन घटवलं आहे. वजन घटवणारी ही व्यक्ती व्यवसायाने शेफ आहे. त्याच्या वजन घटण्याचं रहस्य जेव्हा त्याने उघड केलं तेव्हा अनेकांना धक्का बसला. कारण वजन कमी करण्यासाठी टाळल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये पिझ्झा या पदार्थाचा समावेश प्रामुख्याने होतो. मग, त्याने फक्त पिझ्झा खाऊन वजन कसं कमी केलं, यावर अनेकांना आश्चर्य वाटलं.

त्यावर त्यानेच हे गुपित उघड केलं. तो म्हणाला की, मी रोज दुपारच्या जेवणात पिझ्झा खातो. पण, हा पिझ्झा पॅक्ड फूड किंवा रेडी टू इट प्रकारातला नसतो. तो मी स्वतः तयार करतो. यासाठी मी पिझ्झा बेसही स्वतःच्या हाताने पाणी, मीठ आणि यीस्टचा वापर करून तयार करतो. त्यावरचे टॉपिंग्ज मात्र खास असतात. टॉपिंग्जमध्ये मी वेगवेगळ्या पौष्टिक भाज्या, मशरूम्स किंवा मांस यांचा वापर करतो. पण, सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी या पिझ्झावर चीज अतिशय कमी प्रमाणात घालतो. त्यामुळे माझ्या शरीरात अतिरिक्त फॅट्स आणि कर्बोदके जात नाहीत, असा खुलासा या शेफने केला आहे.

पिझ्झासोबत अनेकजण कोल्ड्रिंक पिणं पसंत करतात. त्यामुळे पोटात सोडा, मैदा आणि साखर जाते. जे वजन तर वाढवतातच पण शरीराला हानीही पोहोचू शकते. त्यामुळे कोल्ड्रिंकऐवजी तुम्ही फळांचे ज्यूस घ्या. तसंच शरीराला आवश्यक असा व्यायामही दररोज सुरू ठेवा, असा मोलाचा सल्लाही या शेफने दिला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या