‘चेहरे’चा फर्स्ट लूक प्रदर्शित, बिग बींसोबत प्रथमच इम्रान साकारणार भूमिका

1035

‘बर्ड ऑफ ब्लड’ या वेब सीरिज आणि यावर्षी 18 जानेवारीला प्रदर्शित झालेल्या ‘वाय चिट इंडिया’ या चित्रपटात इम्रान हाश्मी झळकला होता. पण आता सुमारे वर्षांनंतर ‘चेहरे’ हा त्याचा चित्रपट रसिकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे इम्रान हाश्मी आणि बिग बी प्रथमच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

बिग बी आणि इमरान हाश्मी यांच्या ‘चेहरे’ या चित्रपट प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. या चित्रपटाचे पोस्टर इम्रान हाश्मी याने आपल्या इंस्टाग्राम अंकाऊटवर पोस्ट केले आहे. इम्रान  हाश्मी आणि अमिताभ हे प्रथमच एकत्र पडद्यावर झळकणार असून इंस्टाग्रामवरील पोस्टवर ‘लॉक द डेट’ असे नमूद करत त्याने चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शनाच्या तारखेसह पोस्ट केले आहे.’चेहरे’ हा चित्रपट 21 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार होता. मात्र काही कारणामुळे या चित्रपटाची तारीख पुढे ढकलली असून आता हा चित्रपट 24 एप्रिल, 2020 ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कृति खरबंदा प्रमुख भूमिकेत असल्याची चर्चा होत आहे. तसेच रिया चक्रवर्ती आणि धृतिमन चटर्जी हेदेखील चित्रपटात दिसणार आहेत.

चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा नवीन लूक समोर येणार आहे.या पोस्टरमध्ये बिग बी यांनी काळ्या रंगाचा चष्मा व टोपी घातली आहे. चित्रपटात ते दाढी वाढवलेल्या रुपात दिसणार आहेत. इम्रान हाश्मीदेखील एका नवीन लुकमध्ये दिसणार आहे.


View this post on Instagram

Lock the date !!

A post shared by Emraan Hashmi (@therealemraan) on

बिग बी या चित्रपटाबरोबरच ब्रह्मास्त्र, गुलाबो,सीताबो या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.याशिवाय ते कन्नड चित्रपट बटरफ्लाय मध्ये देखील दिसणार आहेत.सध्या बिग बी हे टीव्ही शो केबीसीच्या चित्रीकरणात गुंतले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या