रिक्षामध्ये बांधले घर, चेन्नईच्या अरुण प्रभूची करामत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चेन्नईतील अरुण प्रभू नावाच्या व्यक्तीने ऑटो रिक्षाचे रूपांतर एका आलिशान घरामध्ये करून सर्कांनाच थक्क केले आहे. मोकळी जागा, खिडक्या- दरवाजे, छत, कपडे काळण्याची व्यवस्था, केंटिलेशन… एका मोठय़ा घरात दिसतील अशा सर्व सोयीसुविधा या ऑटो हाऊसमध्ये आहेत. याबद्दल अरुण प्रभू यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अरुण प्रभू सांगतात, एखाद्या सामान्य घरात ज्या गोष्टी असतात, त्या सगळ्या या घरात आहेत. छताकर सोलार पॅनेल लाकले आहेत. सौरऊर्जेकर घरातील विजेची गरज भागवली जाते. पाणीसाठय़ाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

ऑटो रिक्षा हाऊसच्या करामतीवर नेटिजन्स खूश झालेले आहेत. मोठय़ा प्रमाणात ऑटो हाऊसचे फोटो शेअर होत आहेत. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीदेखील ऑटो हाऊससंदर्भातील ट्किट शेअर करत अरुण प्रभू यांची प्रशंसा केली आहे. बोलेरो पिकअपचे रूपांतर अशा आलिशान घरामध्ये केलेत, तर मला खूप आनंद होईल, असं म्हणत आनंद महिंद्रा यांनी अरुण प्रभूंसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच कोरोना काळानंतर भटकंती करणाऱया लोकांसाठी हा एक चांगला ट्रेंड होऊ शकतो, असे मत महिंद्रा यांनी व्यक्त केले आहे.