गतविजेत्या चेन्नईचा विजयी षटकार, राजस्थानवर अखेरच्या चेंडूवर रोमहर्षक विजय

52

सामना ऑनलाईन । जयपूर

दीपक चहर, रवींद्र जाडेजा, मिचेल सॅण्टनरची प्रभावी गोलंदाजी आणि अंबाती रायुडू व कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्जने गुरुवारी झालेल्या लढतीत राजस्थान रॉयल्सवर चार गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला. आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील हा त्यांचा सहावा विजय ठरला. राजस्थान रॉयल्सला मात्र पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले.

राजस्थान रॉयल्सकडून मिळालेल्या 152 धावांचा पाठलाग करणाऱया चेन्नई सुपरकिंग्जला अखेरच्या षटकात 18 धावांची आवश्यकता होती. बेन स्टोक्सला या षटकात ठसा उमटवता आला नाही. नो बॉलनेही त्याचा घात केला. रवींद्र जाडेजा व मिचेल सॅण्टनर यांच्या षटकारांनी चेन्नई सुपरकिंग्जने अखेरच्या चेंडूवर सनसनाटी विजय संपादन केला. अंबाती रायुडूच्या 57 धावा व कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या 58 धावांनी यावेळी महत्त्वाची भूमिका बजावली.

दरम्यान, याआधी कर्णधार अजिंक्य रहाणे व जोस बटलर या जोडीने पहिल्या विकेटसाठी 31 धावांची भागीदारी केली. यानंतर राजस्थान रॉयल्सच्या इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या