IPL 2020 – दाक्षिणात्य संघांमधील लढाई

आयपीएलमध्ये आज दोन दाक्षिणात्य संघांमध्ये लढाई रंगणार आहे. चेन्नई सुपरकिंग्ज व सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये शुक्रवारी खडाजंगी होईल. यावेळी महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सुपरकिंग्ज संघ सलग दोन पराभवानंतर विजय मिळवून आत्मविश्वास कमवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करील. सनरायझर्स हैदराबादच्या संघाला मात्र विजयाची लय कायम राखायचीय. यासाठीच डेव्हिड वॉर्नरची ब्रिगेड मैदानात प्रचंड मेहनत करताना दिसेल.

रायुडू, ब्राव्होमुळे कायापालट होईल…
चेन्नई सुपरकिंग्सला मागील दोन लढतींत हार सहन करावी लागली आहे. पण उद्या होणाऱया लढतीआधी चेन्नई सुपरकिंग्जच्या चमूसाठी आनंदाची बातमी आहे. अंबाती रायुडू व ड्वेन ब्राव्हो हे दोन प्रमुख खेळाडू फिट झाले आहेत. उद्याच्या लढतीसाठी हे खेळाडू उपलब्ध असल्याची माहितीही सूत्रांकडून देण्यात आली आहे. या दोघांच्या समावेशामुळे चेन्नई सुपरकिंग्जचा कायापालट झाल्यास आश्चर्य वाटणार नाही.

धोनी कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करणार?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करणाऱया महेंद्रसिंग धोनीला आयपीएलमध्ये अद्याप सूर गवसलेला नाहीए. सातत्याने सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत असल्यामुळे त्याच्यावर टीकाही होऊ लागली आहे. संघाला गरज असताना त्याने वरच्या क्रमांकावर फलंदाजीला यावे असे क्रिकेटतज्ञांचे म्हणणे आहे. आता उद्याच्या लढतीत त्याच्या फलंदाजी क्रमावरही साऱयांचे लक्ष असणार आहे.

झोकात पुनरागमन
पहिल्या दोन लढतींत सनरायझर्स हैदराबादला सपाटून मार खावा लागला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघाकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पण सनरायझर्स हैदराबादने तिसऱया लढतीत फॉर्ममध्ये असलेल्या दिल्ली पॅपिटल्सला हरवून झोकात पुनरागमन केले. या लढतीतील विजयाने आगामी लढतींसाठी आत्मविश्वास कमवला.

भट्टी जमून आली
दिल्ली पॅपिटल्सविरुद्धच्या लढतीत कर्णधार डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो व केन विल्यमसन या परदेशी क्रिकेटपटूंनी खेळपट्टीची नस ओळखून दमदार फलंदाजी केली. त्यानंतर भुवनेश्वरपुमार, राशीद खान या अनुभवी गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली. एपूणच काय तर महत्त्वाच्या लढतीत सनरायझर्स हैदराबादची भट्टी चांगलीच जमून आली. आता याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी संघ प्रयत्न करील यात शंका नाही.

आजची लढत
चेन्नई सुपरकिंग्स वि. सनरायझर्स हैदराबाद
दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, दुबई
रात्री 7.30 वाजता

आपली प्रतिक्रिया द्या