छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. जवानांना सहा नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले. यात दोन महिलांचाही समावेश आहे. जवानांनी या कारवाईत शस्त्रs आणि मृतदेह ताब्यात घेतले असून चकमकीत दोन जवानांनाही गोळय़ा लागल्या. दरम्यान, या परिसरात आता नक्षलवाद्यांची शोधमोहीम जोरात सुरू आहे.
तेलंगणाच्या ग्रेहाऊंड पोलिसांना कोट्टगुडेम जिह्यातील गुंडाला करकागुडेम भागात मोठय़ा प्रमाणावर नक्षलवादी असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी एक दिवस आधीच शोधमोहीम सुरू केली. यादरम्यान सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. दरम्यान, आज सकाळीच सुरक्षा दलाचे जवान नक्षलवाद्यांचा अड्डय़ावर पोहोचले. तिथे चकमक उडाली. दोन्ही बाजूंनी अंधाधुंद गोळीबार झाला.
– 3 सप्टेंबर रोजी दंतेवाडा जिह्यातील बैलादिला डोंगराच्या खाली वसलेल्या गावांच्या जंगलात चकमक उडाली. सुरक्षा दलाच्या जवानांनी तेलंगणातील रहिवासी डीकेएसझेडसी रणधीरसह 9 माओवाद्यांचा खात्मा केला. रणधीरवर 25 लाखांचे तर ठार झालेल्या सर्व नक्षलवाद्यांवर एपूण 59 लाख रुपयांचे बक्षीस होते.
– ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये एक विभागीय समिती सदस्य, एक एरिया कमिटी सदस्य आणि पक्षाच्या चार सदस्यांचा समावेश आहे. यातील 2 नक्षलवादी हे बस्तरमधील सुकमा आणि विजापूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
– दोन दिवसांतील हा दुसरा मोठा हल्ला आहे. याआधी 3 सप्टेंबर रोजी दंतेवाडा- विजापूर सीमेवर 9 नक्षलवादी मारले गेले होते. आता तेलंगणा सीमवर 6 नक्षलवादी मारले गेले आहेत.