
छत्रपती संभाजीनगरमध्ये अखेर शिंदे गट व भाजपाची युती तुटली आहे. मिंधे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत याची घोषणा केली.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या जागावाटपावरून भाजप आणि मिंध्यांमध्ये जोरदार घमासान सुरू होतं. दोन्ही पक्षांत आलेल्या उपऱयांसाठी निष्ठावंतांचा बळी दिला जात आहे. त्याचबरोबर नेत्यांना आपापल्या वारसदारांना संधी द्यायची असल्याने निष्ठावंतांना खडय़ासारखे उचलून बाजूला ठेवण्यात येत असल्यामुळे भाजप आणि मिंधे गटात असंतोष उफाळून आला आहे.


























































