
छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पक्षात तिकीट वाटपावरून नाराजीचा सूर उमटला आहे. भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी संभाजीनगर येथील कार्यालयाबाहेर तुफान राडा घातला आहे. तिकीट नाकारल्याने महिला पदाधिकाऱ्यांनी भाजप कार्यालयात जाऊन गोंधळ घातला.
निष्ठावंतांना डावलल्याने महिला कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी एक महिला पदाधिकारी बेशुद्धही पडली. तसेच एकाने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. काही कार्यकर्त्यांनी अतुल सावे आणि भागवंत कराडांच्या केबिनचा दरवाजा तोडून आत शिरण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिसांनाही पाचारण करण्यात आले.
भाजप पक्ष मोठा झाला म्हणून जुन्या कार्यकर्त्यांना विसरत आहे. आम्ही अंगावर 18-18 केसेस घेतल्या, त्यामुळे पक्ष वाढला असा दिव्या उल्हास मराठे या महिला पदाधिकाऱ्याने केला. त्यांनी प्रभाग क्रमांक 20 मधून तिकीट मागितले होते. मात्र त्यांना डावलून भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीला तिकीट देण्याला आरोप त्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांच्या राख्या जमा करा… वापरून घेतात, तिकीट नाकारल्याने भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याचा राडा pic.twitter.com/8KXCb1OcFo
— Saamana Online (@SaamanaOnline) December 30, 2025
पक्षासाठी नोकरी सोडली, रक्ताचे पाणी केले… आणि नवीन माणसांना उमेदवारी दिली, असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केली. आम्ही एकनिष्ठ नाही का? पक्षाच्या नावावर दुकानदाऱ्या केल्या का? असा सवाल कार्यकर्त्यांनी केली. संभाजीनगरमध्ये भाजपचा पराभव करणार असा विडाही भाजप कार्यकर्त्यांनी उचलला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये कमळाबाईची मिंध्यांशी फारकत, अखेर युती तुटली




























































