मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रचना सल्लागार डॉ. चेतन पाटील याला शनिवारी दुपारी मालवण येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. सरकारी वकील व आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने संशयित आरोपी डॉ. पाटील याला 5 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
शनिवारी दुपारी 2.45 वाजता संशयीत आरोपी चेतन पाटील याला शनिवारी मालवण पोलिसांनी न्यायालयात हजर केले. यावेळी पोलीस ठाणे परिसर आणि मालवण न्यायालयाबाहेर कटेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.