Chhattisgarh Encounter – विजापूरमध्ये सुरक्षादलांकडून नक्षवविरोधी मोहीम सुरू, चकमकीत एक नक्षलवादी ठार

छत्तीसगडमध्ये विजापूरच्या जंगलात सुरक्षादलांकडून नक्षलविरोधी मोहीम सुरू आहे. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू असून या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला आहे. डीआरजी आणि एसटीएफ यांच्या संयुक्त पथकाकडून ही कारवाई सुरू आहे. घटनास्थळावरून हत्यारंही हस्तगत करण्यात आली आहेत.

बस्तर रेंजचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी दिलेल्या माहितीनुसार, विजापूरमधील गंगालू ठाण्याअंतर्गत जंगलात नक्षलवादी लपल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी परिसरात नक्षलविरोधी मोहीम हाती घेतली. या मोहीमेदरम्यान सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला.

परिसरात आणखी नक्षलवादी लपल्याची माहिती आहे. सुरक्षा दलाकडून मोहीम अद्याप सुरू आहे. या मोहीमेत अनेक नक्षलवादी मारले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आहे.