छत्तीसगढमध्ये चकमकीत तीन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगढमधील नारायणपूर जिल्ह्यात जवानांसोबत झालेल्या चकमकीत तीन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. गुरुवारी छत्तीसगढच्या नारायणपूर व कांकेर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या मांड जंगलात ही चकमक झाली.

मांड जंगलात काही नक्षलवादी भेटणार असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे गुरुवारी सकाळी पोलीस व सुरक्षा दलाने या भागात शोध मोहीम सुरू केली. या शोधमोहिमे दरम्यान झालेल्या चकमकीत तीन महिला नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.