
सुशांत सिंग राजपूत आणि श्रद्धा कपूर यांच्या ‘छिछोरे’ ने प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी 12 कोटी रुपये कमवले आहेत. माऊथ पब्लिसिटीचा सिनेमाला फायदा होत आहे. कॉलेज जीवन, हॉस्टेल आणि मित्रांची कहाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. नितीश तिवारी सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. पहिल्या दिवशी ‘छिछोरे’ने 7 कोटी 32 लाख रुपये कमवले होते. ट्रेड ऍनालिस्ट तरण आदर्श यांच्या मते, रविवारी ‘छिछोरे’ ची एकूण कमाई 35 कोटींच्या आसपास जाईल. सिनेमाला समीक्षकांनीही गौरवले आहे. त्यामुळे त्याची कमाई वाढेल असा अंदाज आहे.


























































