मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या हेलिकॉप्टरचे उत्तराखंडमधील मुनसियारी येथील रालम येथे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. खराब हवामानामुळे हा निर्णय घेण्यात आला. हेलिकॉप्टर मिलमच्या दिशेने जात होते. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे उपमुख्य निवडणूक अधिकारी विजयकुमनार जोगदंडे हेदेखील होते. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास हवामान बिघडले. पायलटने प्रसंगावधान दावत लगेचच जवळच्या शेतात हेलिकॉप्टरचे सुरक्षित लँडींग केले. हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडींग करण्यात आल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त आणि त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या इतर अधिकाऱयांना जवळच्या अतिथीगृहात नेण्यात आले.